गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:14 IST)

जिओला टक्कर, व्होडाफोनने ‘लहान सॅशे’ प्लान आणला

Vodafone's 'small sash' plan
रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोनने आपल्या युजर्ससाठी एक नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. यात जिओच्या 52 रुपयांच्या प्रीपेड प्लानला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने 59 रुपयांचा ‘लहान सॅशे’ प्लान आणला आहे. या 59 रुपयांच्या या प्लानची वैधता सात दिवसांसाठी असेल. यात ग्राहकांना केवळ इंटरनेट डेटाचा लाभ मिळेल. यामध्ये दररोज एक जीबी डेटा मोफत म्हणजेच सात जीबी डेटा मिळेल.
 
दुसरीकडे, जिओचा 52 रुपयांचा पॅक देखील सात दिवसांच्या वैधतेचा आहे. पण, यात व्होडाफोनपेक्षा अधिक डेटा म्हणजे दररोज 1.05 जीबी डेटा मिळतो. याशिवाय, 70 एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनदेखील मोफत मिळत आहे. टेलिकॉम कंपन्यांचे ‘लहान सॅशे’ पॅक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.