शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (15:50 IST)

एसटीचे तिकिट आरक्षित करण्यासाठी 'पेटीएम करो'

Paytm to reserve ST ticket
मोबाइल वॉलेट अॅप ‘पेटीएम’ने ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’शी (एसटी) भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे आता प्रवासी पेटीएम अॅप आणि वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करू शकणार आहेत. याद्वारे प्रवासी शिवशाही, एसी-शिवनेरी, नाइट एक्स्प्रेस, ऑर्डिनरी एक्स्प्रेस, डे ऑर्डिनरी, शिवशाही स्लीपर, सेमी लक्झरी आदी बसचे तिकीट आरक्षित करु शकतात. याबाबत बोलताना महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यांमधील बस सेवांमध्ये तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवासी पेटीएम अॅप आणि वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करू शकतील.
 
याबाबत बोलताना, “बसच्या प्रवाशांना सुलभतेने आणि सोयीस्कररीत्या बस तिकीट आरक्षित करता यावे यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करता येणार आहे. महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यांमधील बस सेवांमध्ये तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवासी पेटीएम अॅप आणि वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करू शकतील”, अशी प्रतिक्रिया टीएमचे उपाध्यक्ष अभिषेक राजन यांनी दिली.