शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:25 IST)

लवकरच व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार

व्हॉट्सअॅपसाठी लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या यूजर्सना पैसे द्यावे लागतील, असे संकेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने जाहीर केलेल्या अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. १०० कोटींहून अधिक यूजर्स व्हॉट्सअॅप वापरतात. त्याच्या वापरासाठी यूजर्सकडून पैसे घेतल्यास फेसबुकला मोठा नफा होईल, असे सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप आता काही नवीन फिचर्सची चाचणी घेत आहे. या फिचर्सचा वापर करुन ग्राहकांना त्याच्या आवडत्या कंपन्यांबरोबर थेट संवाद साधण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल, असे व्हॉट्सअॅपच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. आम्ही लहान कंपन्यांना मोफत व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप्लिकेशन देणार आहोत. या नव्या अॅपमध्ये आपला व्यापार वाढवण्यासाठी कंपन्यांना खास टूल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर विमान कंपन्या, ई-कॉमर्स साईट्ससारख्या कंपन्यांना या अॅपच्या अॅडव्हान्स अवृत्तीमध्ये एकाच वेळेस हजारो ग्राहकांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.