शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

नाशिककरांचे व्हॉट्सअॅप हॅक झाले

नाशिककरांचे व्हॉट्सअॅप हॅक झाले
नाशिकमधील डॉक्टर, मॉडेल, उद्योजक अशा 40 पेक्षा अधिक नेटीझन्सचे व्हॉट्सअॅप हॅक झाले असून सगळ्यांनी सायबर पोलीसांत धाव घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून अनेकांना मित्र आणि नातेवाईकांना अश्लिल मेसेज, व्हिडीओ क्लिप पाठवल्या जात आहे.  

मोबाईल, व्हॉट्सअॅप, नेट सगळं बंद करुन ठेवलं तरी हॅकर्सचे उद्योग सुरु आहेत. अनेकांच्या मोबाईल आणि फ्रेण्डलिस्टमधल्या शेकडो- हजारो नेटीझन्सला अशा पध्दतीचे मेसेज हॅकर्सकडून पाठवले जात आहेत.