मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (17:15 IST)

व्हॉट्सअॅपमध्ये ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर आले

व्हॉट्सअॅपचे बहुप्रतिक्षित असे ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर आले असून आता चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येणार आहे. अँड्राईड, विंडोज आणि आयओएसवर हे फीचर उपलब्ध झाले आहे. 

व्हॉटसअॅप फायदेशीर ठरत असले तरी अनेकदा त्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. कधीकधी आपण व्हॉटसअॅपवरून चुकून भलत्याच व्यक्तीला मेसेज किंवा फोटो पाठवतो. ती व्यक्ती आपला मित्र किंवा मैत्रिण असेल तर यामुळे निर्माण होणारा गोंधळ थोडक्यात निभावतो. मात्र, कुणा तिऱ्हाईत व्यक्तीला असा चुकीचा मेसेज गेल्यास वाईट अनुभव येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी चूक घडल्यानंतर हा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच डिलिट किंवा अनसेंड करता आला तर असा विचार अनेकांच्या मनात होता. याबद्दल अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती.