मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

'मुंबई- पुणे एक्सप्रेस- वे'वर मिळणार 'वाय-फाय'ची सुविधा

'मुंबई- पुणे एक्सप्रेस- वे'वर प्रवास करताना आता प्रवाशांना लवकरच 'वाय- फाय'ची सुविधा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 94 किमी लांब 'मुंबई- पुणे एक्सप्रेस- वे'वर हायस्पीड 'वाय- फाय' कव्हरेज झोन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीने टेलिकॉम ऑपरेटर्सना यासाठी निमंत्रण दिले आहे.
 
कोणत्या भागांमध्ये वाय-फाय झोन तयार केला जाऊ शकतो यासंबंधी सविस्तर प्लान देण्यासाठी आम्ही टेलिकॉम ऑपरेटर्सना निमंत्रण दिले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीने सह व्यस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. वाय-फाय नेटवर्कमुळे आम्हाला आणि राज्य महामार्ग पोलिसांनाही सीसीटीव्हीच्या माध्यामातून टोल बूथवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे किरण कुरुंदकर बोलले आहेत. नेमके किती वाय-फाय झोन आणि हॉटस्पॉट सुरू करायचे हे अजून निश्चित झालेले नाही. ही सेवा नि:शुल्क असणार आहे, मात्र यासंबंधी अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
 
वाय-फाय व्यतिरिक्त मोबाईल नेटवर्क सुविधाही मजबूत करण्यावर एमएसआरडीसी भर देत आहे. एक्सप्रेस वे वर अनेक अशी ठिकाणी आहेत जिथे मोबाईल नेटवर्क मिळत नाही. या ठिकाणी टेलिकॉम ऑपरेटर्सनी बेस ट्रान्सिव्हर ‍सर्व्हिस बसवावी तसेच इतर पायाभूत सुविधा सुरू कराव्यात, जेणेकरून प्रवासात मोबाईल नेटकर्वची समस्या होणार नाही यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे कुरुंदकर यांनी सांगितले आहे.