सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जून 2019 (14:27 IST)

Xiaomi चा हा दमदार स्मार्टफोन 2000 रुपयांनी स्वस्त झाला

शाओमीने भारतात आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 6 Pro च्या किमतीत 2 हजार रुपयांची कमी केली आहे, तथापि ही कमी फक्त Redmi Note 6 Pro च्या 6GB रॅम व्हेरिएंट मध्येच झाली आहे. या पूर्वी Redmi Note 6 Pro च्या 4GB रॅम व्हेरिएंटच्या किमतीत देखील 2 हजार रुपयांची कमी झाली होती.
 
या कपात नंतर Redmi Note 6 Pro च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आणि 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये झाली आहे. भारतात लाँचिंग दरम्यान Redmi Note 6 Pro ची सुरुवाती किंमत 13,999 रुपये होती. 
 
* Redmi Note 6 Pro तपशील - या फोनमध्ये कूलिंगसाठी पी2आआय वॉटर रिपेलंट नॅनो-टेक्नॉलॉजी दिलेली आहे. त्यासह यात आऊट ऑफ बॉक्स MIUI 10 मिळेल. त्यात ड्युअल सिम सपोर्ट, अँड्रॉइड ऑरियो 8.1 आणि 6.26 इंच फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे ज्याची आस्पेक्ट रेशिओ 19:9 आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 14 एनएम ऑक्टो कोर प्रोसेसर आहे. Note 6 Pro मध्ये ग्राफिक्ससाठी अॅडरेनो 509 GPU देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 4GB/6GB रॅमसह 64GB स्टोरेज मिळेल. यात 4000 एमएएच बॅटरी दिली गेली आहे.
 
* Redmi Note 6 Pro कॅमेरा - यात ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एक कॅमेरा 12 मेगापिक्सेल आणि दुसरा 5 मेगापिक्सेल आहे. तसेच फ्रंटमध्ये देखील ड्युअल कॅमेरे आहे ज्यात एक कॅमेरा 20 मेगापिक्सेल आणि दुसरा 2 मेगापिक्सेल आहे. दोन्ही कॅमेरे एआय आणि ब्युटी मोडसह येतात.