सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (17:41 IST)

Samsung Galaxy M40 मध्ये असेल hole-punch display, जाणून घ्या किंमत आणि फीचर

सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एम सीरिजचा चौथा स्मार्टफोन Galaxy M40 11 जून रोजी सादर करू शकतो. साउथ कोरियन कंज्यूमर कंपनीने मंगळवारी अधिकृत वेबसाइट आणि ईकॉमर्स साइट अमेझॅनवर टीजर जारी केला आहे. या टीजरमध्ये Samsung ने माहिती दिली आहे की येणार्‍या फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले (hole-punch display) लेटेस्ट फीचर देण्यात येईल. त्यासह या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 600 सीरिजचा प्रोसेसर आणि ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यासह कंपनीने अमेझॅन आणि अधिकृत वेबसाइटवर फोनचा फोटो देखील शेअर केला आहे.
 
इतर अहवालांनुसार, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर, 5000 एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅमसह येऊ शकतो. हा अँड्रॉइड पाई ऑफ द बॉक्स वर चालेल. सध्या या फोनमध्ये येणार्‍या डिस्प्लेच्या आकाराबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही पण हे एक सुपर अमोलेड डिस्प्ले असू शकते, ज्यात 128 जीबी इंटरनल मेमरी असू शकते. यासह या फोनची किंमत 25,000 रुपये असू शकते. आतापर्यंत कंपनीने Samsung Galaxy M10, Samsung Galaxy M20 आणि Samsung Galaxy M30 लॉन्च केला आहे आणि आता Samsung Galaxy M40 येणार आहे.