शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (22:44 IST)

'या' कंपनीसाठी कोरोना ठरले वरदान

लॉकडाऊनमुळे झूम अँप कंपनी मालामाल झाली आहे. कोरोना हे वरदान ठरलं आहे. बहुतेक कंपन्या आर्थिक नुकसानीतून जात असताना या काळात कंपनीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे.
 
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व कंपन्यांमधून वर्क फ्रॉर्म होमची सुरूवात झाली. पण यावेळी घरुन काम करताना व्हिडीओ संवाद खूप महत्वाचा ठरतो. ऑनलाइन मिटींग, कॉल, शिक्षण, मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये देखील ऑनलाईन क्लासेसला सुरूवात झाली आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या कंपनीचा व्यवसाय या काळात जोरदार वाढला आहे. गेल्या बर्‍याच दिवसांमध्ये, लोकांनी झूम अ‍ॅप वापरला आहे. त्यामुळेच या कोरोनाच्या काळात कंपनीची कमाई दुप्पट झाली आहे. कोरोनामुळे या कंपनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली  आहे.
 
झूम कंपनीची गेल्या तीन महिन्यातील कमाई दुप्पट ३२.८ कोटी डॉलर्स झाली आहे. ज्यामुळे कंपनीचा नफा २.७ कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या तीन महिन्यात कंपनीची कमाई १ लाख ९८ हजार डॉलर्स इतकी होती. कंपनीची कमाई दुप्पट झाल्यामुळे सहाजिकच वॉल स्ट्रीटवरील कंपनीच्या शेअरची किंमत तिप्पट झाली आहे.