Janmashtami 2019 : 4 महारात्रीमधून एक आहे जन्माष्टमीची रात्र, वाचा उपाय
जन्माष्टमीच्या रात्रीला तंत्रच्या 4 महारात्रीमधून 1 मानले गेले आहे. विशेष रूपाने या रात्रीला शनी, राहू, केतू, भूत, प्रेत, वशीकरण, संमोहन, भक्ती आणि प्रेमाचे प्रयोग व उपाय केल्याने विशेष यश प्राप्ती होते.
विशेष उपाय
* ससंकल्प उपवास करून रात्री देखील भोजन करू नये.
* काळे तीळ आणि औषधी युक्त पाण्याने अंघोळ करावी.
* संतान प्राप्ती आणि कौटुंबिक आनंदासाठी कृष्ण पूजन, अभिषेक करून जन्मोत्सव साजरा करावा.
* धण्याची पंजरी आणि लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवून प्रसाद वितरण करावं.
* इष्ट मूर्ती, मंत्र, यंत्राची विशेष पूजा व साधना करावी.
* श्री राधा कृष्ण बीजमंत्राचा जप करावा.
* भक्ती आणि संतान प्राप्तीसाठी गोपाळ, कृष्ण, राधा किंवा विष्णू सहस्रनाम पाठ व तुळस अर्चन करावे.
* भूत प्रेत बाधा निवारण, रक्षा प्राप्ती हेतू सुदर्शन प्रयोग, देवीकवच पाठ करावं.
* श्रीकृष्ण आणि राधिकाच्या 1000 नावांचे पाठ करावे.
* आकर्षण, संमोहन, वशीकरण, प्रेम प्राप्तीसाठी तांत्रिक प्रयोग करता येतील.
* श्रीकृष्णाच्या आवडत्या वस्तूंनी त्यांचा शृंगार करावा.