56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा
५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय.
५६ भोग म्हणजे काय?
'छप्पन' म्हणजे ५६ आणि 'भोग' म्हणजे देवाला अर्पण केलेले अन्न किंवा नैवेद्य. यामध्ये विविध प्रकारच्या मिठाई, नमकीन, फळे, सुका मेवा, पेये, अन्न धान्य आणि पक्वान्नांचा समावेश असतो.
५६ भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथागोवर्धन पर्वत कथा:
पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.

५६ भोगात प्रामुख्याने काय असते?
१. भक्त (भात),
२. सूप (डाळ),
३. प्रलेह (चटनी),
४. सदिका (कढी),
५. दधिशाकजा (दही पातळ भाजी),
६. सिखरिणी (सिखरन),
७. अवलेह (सरबत),
८. बालका (बाटी),
९. इक्षु खेरिणी (मुरंबा),
१०. त्रिकोण (साखरेचा),
११. बटक (वडा),
१२. मधु शीर्षक (मठरी),
१३. फेणिका (फेणी),
१४. परिष्टश्च (पूरी),
१५. शतपत्र (खजला),
१६. सधिद्रक (घेवर),
१७. चक्राम (मालपुआ),
१८. चिल्डिका (चोला),
१९. सुधाकुंडलिका (जिलबी),
२०. धृतपूर (मेसू),
२१. वायुपूर (रसगुल्ला),
२२. चन्द्रकला (मिष्ठान),
२३. दधि (कोशिंबीर),
२४. स्थूली (थूली),
२५. कर्पूरनाड़ी (लवंगपूरी),
२६. खंड मंडल (खुरमा),
२७. गोधूम (भरडलेले धान्य),
२८. परिखा,
२९. सुफलाढय़ा (बडीशेप),
३०. दधिरूप (बिलसारू),
३१. मोदक,
३२. शाक (भाजी),
३३. सौधान (लोणचे),
३४. मंडका (मोठ),
३५. पायस (खीर),
३६. दधि (दही),
३७. गोघृत (गायीचे तूप),
३८. हैयंगपीनम (लोणी),
३९. मंडूरी (साय),
४०. कूपिका (रबडी),
४१. पर्पट (पापड),
४२. शक्तिका (काकवी),
४३. लसिका (लस्सी),
४४. सुवत,
४५. संघाय (मोहन),
४६. सुफला (सुपारी),
४७. सिता (वेलची),
४८. फळ,
४९. तांबूल,
५०. मोहन भोग,
५१. लवण,
५२. कषाय,
५३. मधुर,
५४. तिक्त,
५५. कटु,
५६. अम्ल.