शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:54 IST)

PKL 2022: दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डी लीग चॅम्पियन बनली, अंतिम सामन्यात पटना पायरेट्सचा 1 गुणाने पराभव केला

delhi dabang
एका रोमहर्षक सामन्यात दबंग दिल्लीने पटना पायरेट्सचा पराभव करत प्रथमच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. शुक्रवारी बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या लढतीत दिल्लीचा संघ पूर्वार्धानंतर पिछाडीवर पडला होता, परंतु अखेरच्या क्षणी त्याने बाजी मारली. दिल्लीने पटनावर 1 गुणाने मात केली. पटना संघ चौथ्यांदा प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला पण दिल्लीने बाजी मारत जेतेपद पटकावले.