शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Updated : रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (12:39 IST)

प्रो कबड्डी लीग: हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा

प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामातील (PKL) सामना हरियाणा स्टीलर्स आणि यू मुंबा (HAR vs MUM) यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांमधला सामना 13 फेब्रुवारीला बंगळुरूच्या शेरेटन ग्रँड बेंगळुरू व्हाईटफिल्ड हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे.
 
हरियाणा स्टीलर्सने पीकेएल 8 मध्ये आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 9 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे आणि 3 सामने टाय झाले आहेत. ते सध्या 58 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे यू मुम्बाने पीकेएल 8 मध्ये 18 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि आतापर्यंत 6 सामने गमावले आहेत. त्यांचे 5 सामने बरोबरीत झाले असून ते 53 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. गेल्या सामन्यात यू मुम्बाने जबरदस्त विजय नोंदवला होता.
 
हरियाणा स्टीलर्स
सुरेंदर नाडा, विकास कंडोला, आशिष कुमार, मीतू, रवी कुमार, जयदीप कुलदीप आणि मोहित.
 
यू मुंबा संघ -
फजल अत्राचली, हरेंद्र कुमार, अभिषेक सिंग, व्ही अजित कुमार, राहुल सेटपाल, शिवम आणि रिंकू.