शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (19:53 IST)

प्रो कबड्डी लीग:दबंग दिल्ली Vsबेंगळुरू बुल्स

प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामातील (PKL) 93 वा सामना दबंग दिल्ली आणि बेंगळुरू बुल्स (DEL vs BLR) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना 4 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 8:30 वाजता सुरु होईल.
 
दबंग दिल्लीने PKL 8 मध्ये 16 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 9 सामने जिंकले आहेत. त्यांनी 5 सामने गमावले असून दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. तो सध्या 54 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दबंग दिल्लीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे बेंगळुरू बुल्सने 17 सामने खेळले असून त्यांनी 9 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यांत त्यांचा पराभव झाला असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. गुणतालिकेत तो 51 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बेंगळुरू बुल्स संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय नोंदवला होता.
 
दबंग दिल्ली
जोगिंदर नरवाल, जीवा कुमार, मनजीत चिल्लर, संदीप नरवाल, विजय मलिक, नीरज नरवाल आणि आशु मलिक.
 
बेंगळुरू बुल्स
पवन कुमार सेहरावत, भरत, अमन, सौरभ नंदल, मोहित सेहरावत, अंकित आणि जीबी मोरे.