1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
  4. Ahmednagar Lok Sabha Constituency 2019

अहमदनगर लोकसभा निवडणूक 2019 Ahmednagar Lok Sabha Election 2019

Ahmednagar lok sabha election result 2019
मुख्य लढत : सुजय राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी)  
 
या लढतीत कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी तिकीट मिळाल्याने नसल्यामुळे त्यांनी पक्ष सोडत भाजपा मध्ये प्रवेश केला. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनाम दिला असून, आता नगर येथील हे लढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संग्राम पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यात होत आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.