1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (19:40 IST)

बीड येथून भाजपाच्या प्रीतम मुंडे भरणार उमेदवारी अर्ज

pritam munde
भाजप पक्षाकडून बीडमध्ये विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनाच उमेदवारी जाहीर झाली असून, सोबतच धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि व भाजपा उमेदवार प्रितम मुंडे दोघांचाही उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात येणार आहे.

खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रंगत वाढणार असून  मुख्य पक्षांच्या उमेदवारांसह इतर उमेदवारही लवकरच अर्ज दाखल करतील. मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव क्षेत्र असलेल्या बीड येथे मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच होणार आहे.भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रितम मुंडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. आता सोमवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.