1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
  4. Beed Lok Sabha Election 2019 live results

बीड लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results । Beed Lok Sabha Election 2019 live results

[$--lok#2019#state#maharashtra--$] 
मुख्य लढत : डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विरुद्ध बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी)
 
या लढतीला ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वादाची किनार लाभल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ अशी लढत आहे.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$] 
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते. 
पुढील लेख
उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results