1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

अफजल गुरुला फाशी द्या- मोदी

पंतप्रधान मनमोहन सिंग हे कमकुवत नसतील तर त्यांनी संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुला फाशी देऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे आव्हान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांना दिले आहे.

उच्च न्यायालयाने संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत हे प्रकरणच टांगते ठेवले असून, पंतप्रधान जर खरंच कमकुवत नसतील तर त्यांनी अफजल गुरुला फासावर लटकवावे अशी मागणी मोदींनी केली.

केवळ पत्रकारपरिषदांमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याने कोणी आक्रमक ठरू शकत नाही, तर यासाठी प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे असल्याचा टोमणाही मोदींनी लगावला.