1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

आता 'सोनिया चालिसा'

कॉंग्रेस
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाटगिरीलाही उधाण येते. कॉंग्रेसच्या अशाच एका 'भाट' कार्यकर्त्याने 'हनुमान चालिसा'च्या धर्तीवर 'सोनिया चालिसा' लिहिली असून तिचे पारायणही पक्षाच्या कार्यालयात होते. पण आता हिंदूत्ववादी भाजपच्या नेत्यांनी या सोनिया चालिसेवर आक्षेप नोंदवला असून हा चालिसा वगैरे ही हिंदूंची मक्तेदारी असून कॉंग्रेसजनांनी असे करून हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

कॉंग्रेसच्या जयपूर रोडस्थित कार्यालयात गेले पाच दिवस या सोनिया चालिसेचे पठण सुरू आहे. पण भाजपवाल्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष जसराज जयपाल यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. वादानंतर आता हे चालिसा पठण बंद करण्यात आले आहे. अशोक शर्मा या कार्यकर्त्याने ही चालिसा लिहिली आहे. 'ओम सोनिया माता' अशी तिची सुरवात आहे. या चालिसा पठणाने कॉंग्रेसला शक्ती मिळेल व देश प्रगतीपथावर वाटचाल करेल, अशी त्यांची श्रद्धा आहे. गेल्या निवडणुकीत एका कार्यकर्त्याने 'लालू चालिसा' लिहिली होती.