पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणा-यांनी आधी आपल्या पक्षातील जागा जिंकून दाखवाव्या, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना कॉंग्रेसने ते दिवास्वप्न पाहत असून आमचे उमेदवार मनमोहन सिंह हेच आहेत हे पुन्हा एकदा जाहीर केले आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, की मनमोहन सिंह हेच आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आणि निवडणुकीनंतर तेच पंतप्रधान असतील. हे कॉंग्रेसने आधीच जाहीर केले आहे. पंतप्रधानपदाची भाषा करणा-यांनी आधी आपल्या पक्षाच्या जागा जिंकून दाखव्यात असे आव्हानही त्यांनी केले आहे.