देशभरात ६० टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १२४ मतदारसंघात जवळपास ६० टक्के मतदान झाले. बिहार, झारखंड व छत्तीसगड या राज्यात नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे मतदानाला गालबोट लागले. यात सुरक्षा दलांच्या दहा कर्मचार्यांसह सतरा जण मृत्युमुखी पडले.
या १२४ जागांसाठी १७१५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मात्र, या यंत्रात कुणाला कौल दिलाय हे मात्र सोळा मेस म्हणजे तब्बल महिन्याभरानंतर कळणार आहे. कारण पाच टप्प्यांत मतदान झाल्यानंतर सोळा मेस मतमोजणी होणार आहे.
आज ज्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले, त्यात लालू प्रसाद यादव, मुरली मनोहर जोशी, रामविलास पासवान, के. चंद्रशेखर राव, रेणुका चौधरी, प्रफुल्ल पटेल, मनोज तिवारी, शशी थरूर, यशवंत सिन्हा, एस. जयपाल रेड्डी यांचा समावेश आहे.
ओरीसात नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी हल्ले करून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सला आगी लावल्या. राज्याच्या दक्षिण भागात बंदचे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या चकमकीत २७ जण जखमी झाले. यातील पाच जणांची अवस्था गंभीर आहे. देशाच्या इतर भागातही हिंसाचार झाला.
ओरीसात लोकसभेच्या २१ व विधानसभेच्या १४७ पैकी ७० जागांसाठी तर आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २२ व विधानसभेच्या १५४ जागांसाठी मतदान झाले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आंध्र प्रदेशात ६५, बिहारमध्ये ४६, महाराष्ट्रात ५४, ओरीसा ५३, उत्तर प्रदेशात ४८ ते ५०, छत्तीसगडमध्ये ५१, झारखंडमध्ये ५०, नागालॅंडमध्ये ८४ व जम्मू काश्मीरमध्ये ४८ टक्के मतदान झाले.
बिहारमध्ये सर्वांत कमी ४५ टक्के तर लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक म्हणजे ८६ टक्के मतदान झाले.