1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

पाकमध्येही अडवाणींचा प्रचार

सत्तेवर आल्यानंतर पाकला धडा शिकवण्याची भाषा भाजपचे अनेक नेते आपल्या सभांच्या माध्यमातून करत आहेत. अडवाणींनीही हीच भूमिका घेतली असली तरी, पाकमधील प्रसारमाध्यमं तसेच वर्तमानपत्रात भाजप, आणि लालकृष्ण अडवाणी यांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती छापून आल्या आहेत.

भारतातील जाहिरातींप्रमाणेच या जाहिरातींचा मचकुर असून, जणू काही पाकच्या मतदारांना अडवाणी मतं देण्याचे आवाहन करत असल्याचे या जाहिराती रेखाटण्यात आल्या आहेत.

भाजपने आपला प्रचार हायटेक केला आहे. प्रसारमाध्यमांसह अनेक संकेतस्थळ आणि विविध सिडींच्या माध्यमातून अडवाणींची आणि भाजपची जाहीरात केली जात आहे.

अमेरिका आणि ब्रिटनमध्येही काही पक्षांनी आपल्या जाहिराती दिल्याच होत्या आता सत्तेवर आल्यानंतर पाकला धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या जाहिरातीही पाकमधील वर्तमानपत्रात दिसत आहेत.

पाकमधील जंग आणि डॉन या वर्तमानपत्रात अडवाणींच्या जाहिराती आहेत. तर येथील प्रसारमाध्यमांनी भारतातील निवडणुकांचे विश्लेषण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांची आखणी केली आहे.