1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

सरकार कसाबला पोसतेय- उद्धव

सरकार कसाबला पोसतेय उद्धव
मुंबई हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या पाक दहातवादी अजमल कसाब याची तुरुंगात खातिरदारी करण्‍यात येत असून, सरकार कसाबला फुकटात पोसत असल्याचे आरोप शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहेत.

उद्धव यांची अहमदनगर येथे आज सभा झाली. या सभेत त्यांनी सरकारसह मुंबई पोलिसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

कसाबची आई त्याला भेटायला येणार असून, तो आपल्या आईलाही सरकारी पाऊणचाराबद्दल सांगणार असल्याचा टोमणा उद्धव यांनी लगावला.
कसाबला गेट वे ऑफ इंडियावर फाशी देण्यात यावे अशी मागणी करतानाच उद्धव यांनी कॉंग्रेस सरकारवर जोरदार प्रहार केला.
About Writer
भाषा