1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (16:52 IST)

नशेत गळ्यात अजगराला गुंडाळलं, मुलाने जीव वाचवला

From Kitasoti Khurd village of Garhwa
दारूच्या नशेत असलेले वाटेलते करतात. दारूच्या नशेत एका व्यक्तीला अजगराशी खेळणे जड झाले. दारूच्या नशेत त्याने भला मोठ्या अजगराला गळ्यात गुंडाळले आणि महाकाय अजगराने त्याला आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली. त्याचा श्वास गुदमरू लागला आणि त्याने आपला जीव वाचविण्यासाठी  आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याचा 14 वर्षाचा मुलगा धावत आला आणि त्याने सुमारे 15 ते 20 मिनिटे प्रयत्न करून आपल्या पिताला अजगराच्या विळ्ख्यापासून मुक्त केले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजगराबद्दल कुप्रसिद्ध आहे की तो आपल्या भक्ष्याला पकडतो आणि मरेपर्यंत त्याला सोडत नाही. वडिलांना अडचणीत पाहून त्यांचा मुलगा मित्राच्या मदतीने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतो.