1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (18:26 IST)

चाय आईस्क्रीम व्हिडीओ व्हायरल, युजर्स संतापले

आजकाल सोशल मीडिया अशा खाद्यपदार्थांनी भरला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर विक्रेते काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने दोन पूर्णपणे भिन्न पदार्थ एकत्र करतात. आणि नवीन पदार्थ बनवतात. अनेक वेळा काही नवीन खाद्य पदार्थ तयार करण्याची ही कल्पना यशस्वी होते, तर बहुतेक वेळा या हे पदार्थ फसतात. नवनवीन खाद्य पदार्थ तयार करण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर  पाहायला मिळतात. जे यूजर्सला खूप आवडतात. तर काही व्हिडीओ युजर्सला आवडत नाही.सध्या सोशल मीडियावर चाय आईस्क्रीमचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्यावरील एक विक्रेता चहाचे नवीन प्रयोग करताना दिसत आहे. चहाचे आईस्क्रीम  करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर 'मी नाशिककर ' या पेजवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता चहाआईस्क्रीम बनवून चॉकलेटसह सर्व्ह करताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये विक्रेता बर्फाच्या तव्यावर गरम चहा घालतो आणि त्यात दूध आणि चॉकलेट सिरप घालून आईस्क्रीम रोल बनवतो आणि सर्व्ह करतो. 
 
सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून नेटकरी या चहा आईस्क्रीमला नापसंत करत आहे.  
Edited  by - Priya Dixit