शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (11:17 IST)

काय सांगता, मुलाला दंश केल्यावर सापाचा मृत्यू

snake
छत्तीसगडच्या जशपूर मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. साप हा सर्वात विषारी सरपटणारा प्राणी आहे. सापाचे नाव घेतातच अंगावर शहारा येतो. साप ने चावा घेतल्यावर मृत्यू अटळ आहे. परंतु छत्तीसगडच्या जशपूर मध्ये अंगणात खेळत असलेल्या मुलाला विषारी सापाने दंश केला. या वरून मुलाने चिडून त्या सापाचा चावा घेतला आणि साप मेला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जशपूर हे  विषारी सापासाठी प्रसिद्ध असून या भागात विषारी आणि कोब्रा साप आढळतात. 

सदर घटना छत्तीसगडच्या जशपूर येथील पंडरापाठ येथे राहणारा दीपक राम घराच्या अंगणात खेळत असताना त्याला विषारी सापाने चावा घेतला. चिडून दीपक सापाला कडकडून चावला. सापाला चावल्यामुळे साप जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सापाने चावल्यामुळे दिपकला तातडीनं रुग्णालयात नेले आणि त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. दीपक ची प्रकृती बरी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची चर्चा परिसरात केली जात असून खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit