बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified सोमवार, 20 जून 2022 (17:31 IST)

सापाने चावल्यावर ,सापाला मारून तरुणानं खाल्लं

snake
सापाचं नाव जरी घेतलं की अंगाचा थरकाप उडतो. पण उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात कामसीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायोहत गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका शेतकरी तरुणाला सापाने चावल्यावर त्याला राग आला आणि त्याने चक्क सापाला पकडून गाजर -मुळा प्रमाणे चावून खाल्ले.नंतर रुग्णालयाची धाव घेतली. या घटनेची चर्चा परिसरातील गावात केली जात आहे.  
 
साधारण पणे साप चावल्यावर एखादी व्यक्ती घाबरते किंवा बेशुद्ध होते. पण शेवहात गावात शेतकरी माताबलला काम करताना साप चावला. या वर त्याने चिडून सापाला ठार मारलं आणि मग त्याने सापाला गाजर -मुळा प्रमाणे चावून खाल्लं. ही माहिती मिळतातच त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.तिथून त्याला बांदाच्या शासकीय रुग्णालयात रेफर केलं. तिथे त्यावर उपचार सुरु आहे. आणि त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळतातच  सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.