बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (10:29 IST)

बंडातात्या कराडकरांनी गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. गांधीजीचा अंहिंसावाद आणि हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. 
 
त्यांनी वादग्रस्त विधान हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर केलं. तसंच त्यांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हाताऱ्या म्हणून ही केला. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी 'साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाल, मिली हमें आजादी बिना खंड बिना ढाल' असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.
 
महात्मा गांधींना म्हाताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नसून या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर 1 हजार वर्ष लागली असती, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं.