मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (16:44 IST)

वर्धातील तरुणाला सापावर खेळणे जीवावर बेतले,तरुणाचा मृत्यू

snake
Snake Bite Man Died :सध्या काही लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यासाठी काहीही करतात. आणि लाईक्स मिळवतात. पण कधी कधी असं कारण महागात पडू शकत. याचे उदाहरण म्हणजे स्टंट करणे एका तरुणाला भोवले आणि त्याला प्राणाला मुकावे लागले. वर्धात विषारी सापासोबत खेळणे तरुणाला महागात पडून त्याला जीव गमवावा लागला. प्रशांत काशिनाथ काकडे (35)असे या मृत तरुणाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार  वर्धा जिल्ह्यात सोनेवाडीत राहणारा प्रशांत सर्पमित्र होता आणि तो गेल्या 15 वर्षांपासून साप पकडायचा. त्याने  विक्रमशिला नगर मध्ये निघालेला साप धामण समजून मण्यार पकडला.मण्यार अत्यंत विषारी जातीचा साप आहे. त्याने सापाला पडकून रेस्क्यू केलं आणि नंतर बाटलीतुन साप काढून सोडताना त्याने सापाला हाताने पकडलं त्या सापाने प्रशांतच्या बोटाला दंश केलं त्याला असं काही घडेल ह्याची काहीच कल्पना नव्हती. सापाशी खेळतानाचा व्हिडीओ काही लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून तो व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 
सापाने त्याला दंश केल्यावर त्याची तब्बेत बिघडली प्रशांतला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited By- Priya Dixit