शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (13:48 IST)

एका चिमुकल्यांने आईचा जीव वाचवला, व्हिडीओ व्हायरल

आई आणि मुलाचं नातं वेगळंच असते. मुलाला काहीही झालं तर आई खूप अस्वस्थ होते. आपल्या पाल्याला कोणत्याही त्रासात आई पाहू शकत नाही. आईचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. तसेच मुलाचे देखील आपल्या आईवर प्रेम असते. मुलं देखील आपल्या आईला कोणत्याही संकटात पाहू शकत नाही.आपल्या आईला संकटातून वाचविण्यासाठी एका चिमुकल्यांने जे काही केलं ते कौतुकास्पद आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओ मध्ये एक महिला शिडीचा वापर करून गॅरेजच्या दाराला दुरुस्त करत आहे. अचानक शिडी घसरून खाली पडते आणि महिला दाराला लटकलेली असते. चिमुकला आपल्या आईला संकटात पाहून तातडीनं धावत येतो आणि शिडी उचलून आईपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी तो यशस्वी होतो. अशा प्रकारे चिमुकल्याने हारून न जात हिम्मतीने आईला वाचविण्यात यश मिळवले. 
हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 
 
दीपांशु काबरा यांनी लिहिले आहे की, आई गॅरेजचा दार दुरुस्त करताना शिडी पडली आईला दारावर लटकलेले पाहून लहानग्याने आपल्या धाडसाचे परिचय देऊन आईला वाचविण्यासाठी धडपड केली. या मुलाचे जेवढे कौतुक करावे कमीच आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. नेटकरी या मुलाचं कौतुक करत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit