1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified सोमवार, 6 जून 2022 (19:13 IST)

हिंदू विधीनुसार कुत्रा-कुत्रीचा विवाह दणक्यात झाला, 500 वऱ्हाडी उपस्थित

उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये कुत्रा आणि कुत्रीचा अनोखा विवाह पार पडला. मंदिराच्या दोन महंतांनी हिंदू रितीरिवाजांनुसार कुत्रा आणि कुत्रीचे लग्न लावून मोठा संदेश दिला. कुत्र्याला सोन्या-चांदीचे दागिने घालून लग्नाचे सर्व विधी पार पडले. गावातील सुमारे पाचशे नागरिकांनी बँडवाल्याच्या तालावर ठेका धरला. यासोबतच 500 ग्रामस्थांनी वऱ्हाडी बनून जल्लोष केला.
 
मनेश्वर बाबा शिवमंदिर हे हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सौंखर आणि सिमनौडी गावांच्या खोऱ्यात वसलेले आहे. मंदिराचे महंत स्वामी द्वारकादास महाराज यांनी आपल्या पाळीव कुत्रा कल्लूचं लग्न लावण्याचे ठरवले. गावापासून चाळीस किमी अंतरावर असलेल्या परच्छाच गावातील बजरंगबली मंदिराचे महंत स्वामी अर्जुनदास महाराज यांची पाळीव कुत्री भुरीसोबत महंतांनी आपल्या कल्लू या कुत्र्याचा विवाह ठरवला होता.
 
रविवारी महंत द्वारकादास महाराज, महंत अर्जुनदास महाराज यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि गावातील लोकांना लग्नाला उपस्थित राहण्याचे आवाहन करून कार्ड पाठवले होते. मानेश्वर बाबा शिवमंदिर येथून मिरवणूक जल्लोषात निघाली. महंतांनी सांगितले की, मुके प्राणी हे माणसांपेक्षा अधिक निष्ठावान असतात. त्यामुळे दोन्ही पाळीव प्राण्यांचे लग्न लावून समाजाला या वन्य प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
 
कल्लू या कुत्र्याला वर बनवून त्याची थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सौखर गावातील गल्ल्यातून पार पडून परळच गावातील बजरंगबली मंदिरात पोहोचली, तेथे महंत अर्जुनदास महाराज यांनी अनोख्या पद्धतीने शोभायात्रेचे स्वागत केले. 
 
मनेश्वर बाबा शिवमंदिराच्या महंतांनी सांगितले की, परच्छाच गावात श्वान मिरवणुकीचे हिंदू रितीरिवाजाने स्वागत करण्यात आले. पाचशेहून अधिक वऱ्हाडीना जेवण देण्यात आले. त्यानंतर कुत्रा कल्लू आणि कुत्री भुरी यांचा विवाह हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. भुरी हिला महंत अर्जुनदास महाराज यांनी नवीन कपडे घालून सोन्या-चांदीचे दागिने घालून निरोप दिल्याचे सांगितले.