दरवाजा उघडताच नागाने फणा काढला
सापाचं नाव घेतले तरी अंगाचा थरकाप उडतो. जगात सापाच्या अनेक प्रजाती आहेत त्यात काही विषारी असतात तर काही बिनविषारी असतात. सध्या सोशल मीडियावर सापाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या दारावर साप असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक साप चक्क दरवाज्यातून बाहेर येताना दिसत आहे. एवढेच नाही तर व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तीवर फणा काढून फुत्कारत आहे.
व्हिडीओ मध्ये साप लाकडी दाराच्या रिकाम्या जागेतून बाहेर येऊन फणा काढत आहे. एक महिला घराच्या आतमध्ये उभी असताना दिसत आहे. हा व्हिडीओ @TheFigen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.