रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (19:09 IST)

तरुणीची मंदिरात भन्नाट एंट्री, थेट स्कुटीसह गर्भगृहात

सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात त्यापैकी काही व्हिडीओ डोक्याला चक्रवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक मुलगी स्कुटी घेऊन थेट मंदिरात गर्भगृहात जाते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नशिबाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. 

या तरुणीची अशी अवस्था तिच्या चुकीमुळे झाली आहे.ही मुलगी मंदिराच्या बाहेर गाडी पार्क करताना गाडीचा एक्सलेटर देताना गाडी थेट मंदिराच्या गर्भगृहात शिरली आणि समोरच्या नंदीच्या मूर्ती जवळ पडते. नशिबाने तिला काहीही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ @JaikyYadav16 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना यूजरने लिहिले की, 'देव सर्वशक्तिमान आहे, जेव्हा तो तुम्हाला त्याच्या दरबारात बोलावेल तेव्हा तुम्हाला जावे लागेल.'