बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (16:37 IST)

माश्यांमुळे या गावातील लोकांची लग्नं होत नाहीत, झालेले लग्न मोडतात

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील काही गावातील लोक माशांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या अनेकांच्या वैवाहिक जीवनात खोल दरी निर्माण झाली आहे. या गावांमध्ये तरुणांची लग्नं होत नसल्याच्या बातम्याही येत आहेत.पाच हजारांहून अधिक लोकसंख्या माशांमुळे हैराण झाली आहे. त्याची काळजी घेणारे कोणी नाही. 
 
येथे राहणाऱ्या लोकांना रात्री खाणे, बसने ,आंघोळ करणे आणि झोपणेही कठीण झाले आहे. लोक झोपण्याचा प्रयत्न करताच, त्यांच्याजवळ माश्या येऊ लागतात त्यामुळे लोकांची झोप भंग पावते. माशांनी घराच्या छताचा ताबा घेतला आहे. 
 
माशांच्या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी आंदोलने व तक्रारी केल्या. मात्र, कुठेही सुनावणी झाली नाही स्थानिक प्रशासन प्रदूषण विभागाची जबाबदारी सांगून टाळाटाळ करत आहे. 
 
हे प्रकरण अहिरोरी विकास गटाशी संबंधित आहे. येथे 2014 मध्ये कुईया ग्रामसभेत भारत सरकारच्या अर्थसहाय्यित पोल्ट्री योजनेअंतर्गत सागवान पोल्ट्री फार्मची ची स्थापना करण्यात आली. 2017 पासून येथे उत्पादन सुरू झाले. सध्या येथे दररोज दीड लाख कोंबडीची अंडी तयार होतात.पोल्ट्री फार्मची उत्पादन क्षमता वाढल्याने गावकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या. पोल्ट्री फार्मपासून 300 मीटर अंतरावर असलेल्या बदैनपुरवा गावातील ग्रामस्थ माश्यांमुळे हैराण झाले आहेत.गावकरी गेल्या दहा दिवसांपासून येथे आंदोलन करत आहेत.
 
गावात गेल्या वर्षी सात विवाह झाले. ज्यामध्ये 4 मुली आणि 3 मुलांचे लग्न झाले होते. नंतर आजवर गावात एकही लग्न झालेले नाही. तसेच कोणाच्यालग्नाबद्दलही चर्चा होत नाही. माशांच्या प्रादुर्भावामुळे येथील कोणीही आपल्या मुलीचे लग्न करण्यास तयार नसल्याचे श्रावण सांगतात. परिसरातील बदैनपुरवा गाव, दही, झाला पूर्वा, नया गाव, देवरिया आणि एकघरा गावात माशांचा धोका सर्वाधिक आहे. याचे कारण म्हणजे या गावांतील कोणीही आपल्या मुलीचे लग्न करण्यास तयार नाही. 
 
गावातील रहिवासी असलेल्या शरदची पत्नी माशींमुळे त्रस्त होऊन माहेरी गेली होती. आता या माश्यांमुळे ती सासरच्या घरी परतायला तयार नाही.  यामुळे त्यांचे नाते संपुष्टात येण्याचा मार्गावर आहे. येथे राहणार्‍या मुंगलालची पत्नी शिवानीही माशांच्या त्रासामुळे गावात राहण्यास तयार नाही. गावात माशांचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील तरुण आझाद आणि विजय यांच्या पत्नीही आई-वडिलांना सोडून सासरच्या घरी यायला तयार नाहीत. तसेच शिलूची पत्नीही तिच्या माहेरच्या घरी गेल्यापासून गावात परतलीच नाही.  
 
 
Edited by - Priya Dixit