सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (14:44 IST)

शेतकर्‍यांसाठी खास असे 'पीएम किसान अ‍ॅप, जाणून घ्या वैशिष्ट्ये

शेतकरी बांधवांसाठी मोदी सरकारने एक नवी योजना आणली आहे. ती आहे 'पीएम किसान सन्मान निधी योजना' या योजनेचा भाग बनून कोणते ही शेतकरी वर्षाकाठी 6000 रुपये मिळवू शकतो. 2000-2000 च्या तीन हफ्त्यांमध्ये उपलब्ध असलेल्या या रकमेसाठी आपण घरी बसून देखील अर्ज करू शकता. या साठी आपल्याला कोठेही जाण्याची गरज नाही. आपल्याकडे स्मार्टफोन असल्यास आपण त्यामध्ये पी-एम किसान अ‍ॅप डाउनलोड करावं. 
 
आम्ही सांगू इच्छितो आहोत की आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकार देशातील 11 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यासाठी सुमारे 93000 रुपये दिले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कोणत्या सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकर्‍यांच्या हातात ठेवली आहे. सरकार कडून PM-KISAN अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. आधारानुसार, आधारच्या रूपात नावाची सुधारणा, भुगतान किंवा देण्याची स्थितीची तपासणी, आणि स्व नोंदणीसाठी सरकारने मोबाईल अ‍ॅप देखील बनविले आहेत जे आपण गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. 
 
अ‍ॅपचे कोण कोणते फायदे आहे -
* स्वतःची नोंदणी करा.
* नोंदणी आणि देयकाची स्थिती जाणून घ्या.
* लाभार्थीच्या यादीत आपले नाव शोधा.
* आधारावर आपले खरे नाव.
* योजनेची माहिती.
* हेल्पलाइन नंबर डायल करा.
 
आपल्याला सांगू इच्छितो आहोत की डिसेंबर 2018 मध्ये ही योजना अनौपचारिकरीत्या सुरू केली होती. तेव्हा पात्रतेच्या अटीवर असे लिहिले होते की ज्याचा जवळ शेती करण्या सक्षम शेत जमीन 2 हेक्टेयर (5 एकर) आहे, त्यांनाच लाभ मिळेल. मोदी सरकार 2 ने कृषी धारण मर्यादा संपविली. अशा प्रकारे ह्याचा नफा 14.5 कोटी शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आला. त्याचबरोबर मोदी सरकारने आपल्या लाभ्यार्थींची संख्या वाढविण्यासाठी स्व नोंदणीची पद्धत तयार केली आहे.
 
या पूर्वी ही नोंदणी लेखपाल, कानुनगो किंवा कृषी अधिकारी यांचा मार्फत होत होती. जर शेतकऱ्याकडे खतौनी, आधारकार्ड, बँक खाता क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असल्यास शेतकरी pmkisan.nic.in या फामर्स कॉर्नर संकेत स्थळावर जाऊन किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे आपली नोंदणी करू शकतात.