बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (16:42 IST)

भारत सरकारचा इशारा, Fake Oximeter अ‍ॅपपासून सावधान राहा

भारतीय लोकांमध्ये आपत्तीला संधीमध्ये बदलण्याचे कौशल्य आहे. आपत्ती कुठलीही असो तरी त्यातून फायदा कसा कमावायचा याचा मार्ग शोधूनच घेतात. 
 
अलीकडेच एका संशोधनात कळून आले की दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये विकले जाणारे सॅनिटाइझर बनावटी आहेत किंवा त्यापासून आरोग्याला धोका आहे. तसेच ऑक्सीमीटरचे देखील हेच हाल आहेत. दुकानांमध्ये बनावट ऑक्सीमीटर धडल्याने विकले जात आहे. दरम्यान सरकारने ऑक्सीमीटर मोबाइल अॅपबद्दल देखील लोकांना सतर्क केले आहे.
 
सायबर हॅकर बोगस मोबाइल अॅपद्वारे लोकांना शिकार बनवत आहे. केंद्र सरकाराच्या सायबर युनिट साइबरदोस्तने ट्विट करून एडवाइजरी जाहीर केली आहे की यूजर्सने अज्ञात यूआरएलहून ऑक्सीमीटर अॅप डाउनलोड करू नये. असे अॅप्स यूजर्सच्या ऑक्सिजन पातळीची तपासणीचा दावा करतात ते फेक असू शकतात.
 
आरोग्य संस्थांकडून वारंवार सांगितले जात आहे की जर रक्तात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल तर अधिक सावध राहण्याची गरज आहे. अशात ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. बाजारात आता 500 रुपयात देखील ऑक्सीमीटर मिळत आहे.
 
आपण हे जाणून हैराण व्हाल की बाजारात असे ऑक्सीमीटर उपलब्ध आहेत जे फोल्ड पेपर, टूथ ब्रश, पेंसिल इतर वस्तूंमध्ये देखील ब्लड ऑक्सिजन लेवल दर्शवत आहे. अशात ऑक्सीमीटर आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकतं. अश्या ऑक्सिमीटरमध्ये आधीपासूनच ऑक्सिजन रीडिंग फीड केली गेली असते.
 
तर अशात जर आपण विचार न करता कोणतेही ऑक्सिमीटर मशीन खरेदी करता किंवा ऑक्सीमीटर अॅप डाउनलोड करतात तर आपली ही सवय बदलण्याची गरज आहे. एखाद्या चांगल्या ब्रँड आणि प्रमाणित ऑक्सिमीटरचं वापरावे. उल्लेखनीय आहे की रक्तात ऑक्सिजनची पातळी 88 टक्क्यांहून कमी नसावं. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.