बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (09:09 IST)

'ती' वादग्रस्त दोन पुस्तके रद्द

वादग्रस्त पुस्तकांच्या पडताळणीसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ श्री रामदास स्वामी’,गोपीनाथ तळवलकर लिखित ‘संतांचे जीवन प्रसंग’ही दोन पुस्तके रद्द करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत पुरवण्यात आलेल्या सर्वच पुस्तकांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली. 
 
एकभाषिक पुस्तकांच्या योजनेमधील लाखे प्रकाशन, नागपूर यांच्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकामधून संभाजीराजांची बदनामी करण्यात आली आहे, अशाप्रकारचा आक्षेप घेण्यात आला. तसेच प्रतिभा प्रकाशनच्या, गोपीनाथ तळवळकर लिखित ‘संतांचे जीवन प्रसंग’या पुस्तकामधून संत तुकाराम व त्यांच्या पत्नीसंबंधी अवमानकारक मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाने डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष आणि डॉ. गणेश राऊत, पांडुरंग बलकवडे सदस्य असलेल्या त्रिसदस्यीय समितीमार्फत या पुस्तकांची पडताळणी करून पुस्तके रद्द करण्याचा निर्णय घेतला.