शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : बुधवार, 30 जून 2021 (12:08 IST)

12 आंबे 1 लाख 20 हजारांना खरीदे केले, 11 वर्षांच्या मुलीच्या स्वप्नाला दिले पंख

Bought 12 mangoes for Rs. 1 lakh 20 thousand
तुमची आवड आणि उत्साह तुमच्या कोणत्याही ध्येयात अडथळा ठरू शकत नाही. अशीच जमशेदपूर येथील रहिवासी असलेल्या तुलसीची कहाणी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे 11 वर्षीय तुलसीचे शिक्षण थांबले होते. तुळशीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की ती मुलगीच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा टॅब विकत घेऊ शकतील. तेव्हाच तुलसीनेने स्वतः हे विकत घेण्याचा विचार केला.
 
तिने बागेतून आंबे विकून स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कडेला या मुलीचा आंबा विक्रीचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मुलीचे नशिब बदलले.
 
जेव्हा मुंबईतील एका व्यावसायिकाने हा व्हायरल व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याला मुलीची अभ्यासाची आवड पटली आणि 1 लाख 20 हजार रुपयात 12 आंबे खरेदी केले.
 
इतकेच नाही तर तुलसीचा 13 हजार रुपयांचा मोबाईलही खरेदी करुन दिला, त्याचबरोबर संपूर्ण वर्षाच्या अभ्यासासाठी तिचे इंटरनेट रिचार्ज ही केले. आता तुलसीने सुद्धा निर्णय घेतला आहे की अभ्यास करून आणि आयुष्यात उंच झोका घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करेल.