बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (09:43 IST)

74 वर्षांनंतर भेटले भाऊ, फाळणीदरम्यान वेगळे झाले, एकमेकांना बिलगून रडू लागले, भावूक व्हिडिओ व्हायरल

74 वर्षांनंतर भेटले भाऊ, एकमेकांना बिलगून रडू लागले, भावूक व्हिडिओ व्हायरल
करतारपूर (पाकिस्तान): भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीशी संबंधित अनेक कथा आहेत. 1947 च्या फाळणीत अनेक कुटुंबे विभक्त झाली. काही पाकिस्तानात स्थायिक झाले तर काही भारतात राहिले. पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडॉरमध्ये तब्बल 74 वर्षांनंतर फाळणीदरम्यान वेगळे झालेले दोन भाऊ भेटले. पाकिस्तानचा मोहम्मद सिद्दीक आणि भारताचा हबीब उर्फ ​​चिला 7 दशकांनंतर भेटले आणि एकमेकांना बिलगून रडू लागले. या दोन भावांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
 
सिद्दीक हे पाकिस्तानातील फैसलाबाद येथे राहतात आणि त्यांचा भाऊ चीला, ज्याचे पूर्वीचे नाव हबीब होते, ते भारतातील पंजाबमध्ये राहतात. 1947 मध्ये फाळणीपूर्वी दोन्ही भाऊ वेगळे झाले होते आणि आता ते 74 वर्षांनी करतारपूर गुरुद्वारामध्ये भेटले. यावेळी 80 वर्षीय सिद्दीक आणि चिला एकमेकांना मिठी मारून खूप रडले. फाळणीची वेदना त्यांच्या डोळ्यात अजूनही जिवंत होत्या.