गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (17:25 IST)

लग्नाच्या मंडपात आग तरी मटणावर ताव viral Video

सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार भिवंडीत पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात मांडवाला आग लागलेली असतानाही पाहुणा जेवणावर ताव मारताना दिसत आहे.
 
भिवंडीमधील अलाईड पेट्रोल पंपजवळ असणाऱ्या सुमारास खंडू पाडा येथील अन्सारी मेरेज ओपन हॉलला रविवारी मांडवाला भीषण आग लागली. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. ही आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशामन दलाच्या एकूण तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने या आगीत कोणताही जिवीतहानी झाली नाही परंतु या आगीपेक्षाही जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे लग्नामध्ये आलेल्या एका खव्वय्याची.
 
हा व्हिडीओ व्हायरल होत असून यात एक पाहुणा लग्नसमारंभामध्ये ओपन लॉनमध्ये टेबल-खुर्चीवर बसून जेवणाचा आनंद घेताना दिसतेय. या व्यक्तीसमोरील जेवणाच्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे मटणाचे पदार्थ ठेवलेले आहेत. एकीकडे ही व्यक्ती मटणाचा आस्वाद घेत आहे तर मागे स्फोट होताना दिसतायत.
 
आगीच्या ज्वाला अगदी उंच उच जात असताना बघून सुद्धा ही व्यक्ती मात्र निवांत बसून मटणावर ताव मारताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका केल्या आहेत.
 
माहितीनुसार या आगीत मॅरेज हॉलचं मोठं नुकसान झालं आहे. हॉलशेजारी उभ्या 6 गाड्या देखील खाक झाल्याची बातमी आहे. मात्र इतकं नुकसान होत असताना आणि जीवाला धोका असून सुद्धा आरामात जेवणावर ताव मारणार्‍या बघून नेटकरी हा व्हिडिओ व्हायरल केल्या शिवाय राहू शकले नाही.