रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:22 IST)

धावत्या रेल्वेसोबत व्हिडिओ काढण्यासाठी स्टंटबाजी महागात, Viral video

मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील इटारसीमध्ये एका तरुणाला रेल्वे रुळाजवळ उभं राहून व्हिडिओ शूट करणं महागात पडलं. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या वेगवान ट्रेनचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, इटारसीजवळील गावातील संजू चौरे हा तरुण एका मित्रासोबत भोपाळ-नागपूर रेल्वे मार्गावर दररोज फिरायला गेला होता. यादरम्यान, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उभे राहून त्याला मागून येणाऱ्या मालगाडीचा व्हिडिओ बनवायचा होता. त्याला त्याच्या साथीदारामार्फत मालगाडीसोबत व्हिडिओ बनवत होता, त्यादरम्यान तो भरधाव वेगात मालगाडीच्या धडकेत आला. मालगाडीचा वेग अतिशय वेगवान असल्याने त्याचा तोल बिघडला.
 
पथरौता पोलिस ठाण्याचे प्रभारी नागेश वर्मा यांनी सोमवारी सांगितले की, रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इटारसी-नागपूर रेल्वे मार्गावरील होशंगाबाद जिल्ह्यातील इटारसी येथे शरददेव बाबा रेल्वे कल्व्हर्टवर ही घटना घडली असून संजू चौरे (22) असे मृताचे नाव आहे. तो जवळच्या पांजरकला गावातील रहिवासी होता.
 
पोलीस स्टेशनचे प्रभारी वर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीदरम्यान असे समोर आले की, संजू चालत्या ट्रेनमध्ये स्वत:चा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट टाकत होता, ट्रेन आल्याने आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याचा तोल बिघडला आणि ट्रेनला धडकला आणि दूर पडला आणि बेशुद्ध झाला. पोलीस स्टेशनचे प्रभारी वर्मा यांनी सांगितले की, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.