मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (09:27 IST)

मोठी बातमी: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ ग्रेनेडचा स्फोट

पठाणकोट. पंजाबमधील पठाणकोट येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
पठाणकोटचे एसएसपी सुरिंदर लांबा यांनी सांगितले की, पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ ग्रेनेडचा स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपशील तपासला जात आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.
या घटनेनंतर परिसर सील करण्यात आला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.