शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (10:58 IST)

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी उघडले, भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता सर्व मंदिरे उघडण्यात आली आहे. कोरोनामुळे लावलेले लॉक डाऊन उघडल्यानंतर मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी साठी आपल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत आहे. मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन मंदिरात करण्यात येत असल्याचे मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भाविकांना ऑनलाईन क्यू आर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जाईल. मंदिरात सुमारे 2500 भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.