शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (15:46 IST)

नवाब मलिकांचा समीर वानखेडेवर ट्विटरवरून आणखी एक ‘फोटो' उलगडा !

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी पुनः  मध्यरात्रीनंतर ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे असा पोस्ट केला यह. . यामध्ये समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याबाबत नवाब मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. पण, फोटोवरून सवाल केला आहे. ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे ?’ असे प्रश्नार्थक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. या फोटोवर नवाब मलिक अधिक स्पष्टीकरण देण्याची शक्यता असून त्यावर समीर वानखेडे हे आपले काय मत मांडतात, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेसमीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता मध्यरात्रीची वेळ साधत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत सवालही केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे.