शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (14:53 IST)

Fact Check: कपूर - ओव्याचा वास घेतल्याने ऑक्सिजनची पातळी वाढू शकते? जाणून घ्या खरं

- सुरभि भटेवारा
भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक उद्रेक शिगेला पोहोचला आहे. पुन्हा एकदा मागील वर्षांसारखी स्थिती ‍निर्माण झाली आहे अशात साथीच्या आजाराची भीती आणि अनेक प्रकाराच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. एक उपाय व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉमवर सुरु आहे ज्यात घरगुती उपायाने ऑक्सिजनची पातळी वाढवता येते असा दावा केला जाता है। यात सांगण्यात येत आहे की कपूर आणि ओवा हे एका रुमालात बांधून वारंवार वास घेतल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते. परंतू हे कितपत सत्य आहे? यापूर्वी जाणून घ्या काय मेसेज व्हायरल होत आहे-
 
गुजरातच्या संजीवनी हेल्थकेअरच्या डॉ. प्रयागराज डाभी यांच्या नावाने व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की “जैन समुदायाचे नेते प्रमोदभाई मालकन यांच्यासोबत काय झाले हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे. त्यांच्या मुलगा कोरोना पॉजिटिव्ह होता. ऑक्सिजन पातळी 80-85 पर्यंत कमी झाली गेली. चिकित्सकीय सल्ल्यानुसार त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजेचं होतं. परंतू घरगुती उपायाचे जाणकार प्रमोदभाई यांनी कापुराची वडी आणि एक चमचा ओवा एका रुमालात बांधून 10 ते 12 वेळा खोल श्वास घेण्यास सांगितला. प्रत्येक दोन तास असं करत राहिल्यानंतर 24 तासात त्याच्या ऑक्सिजनची पाळती 98-99 पर्यंत पोहचली आणि रुग्णालयात जाण्याची पाळी आली नाही. त्यांच्या एका मित्राला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावर देखील हा उपाय केल्यावर चांगले परिणाम दिसून आले आणि त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ही माहिती समाजासाठी आहे ज्याने इतरांना फायदा मिळू शकेल.”
 
काय आहे सत्य-
वेबदुनियाने डॉ. प्रयागराज डाभी यांच्यासोबत थेट संवाद साधला तर त्यांनी म्हटले की व्हायरल मेसेज खोटा आहे. डॉ. डाभी म्हणाले की त्याचं नाव खराब करण्यासाठी हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यांनी एक मेसेज देखील शेअर करत व्हायरल मेसेजवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे-
 
“लोकहितासाठी डॉ. प्रयागराज दाभी यांचे नाव व त्यांच्या नंबरसह व्हायरल होत असलेल्या बनावट मेसेजवर संदेश
 
नमस्कार, मी डॉ. प्रयागराज डाभी, संजीवनी हेल्थकेअर, भावनगर, गुजरात येथून आहे. मागील काही दिवसांपासून काही लोकं, आमच्याशी वैर ठेवणारे, शत्रू प्रवृत्तीचे तसेच आयुर्वेदाला बदनाम करुन आम्हाला कायद्यात गुंडाळण्यासाठी आमचं नाव व नंबर टाकून कोरोना बरा करणारे आणि ऑक्सिजनची पातळी वाढवणारे बनावट मेसेज व्हायरल करत आहे आणि भोळे लोक हे षड्यंत्र समजत नसून दुसर्‍यांना शेअर करत आहे. आमची विनंती आहे की असे मेसेज आमच्याद्वारे लिहिण्यात आलेले नसून व्हायरल केले जात नाहीये. जर आपण हे फॉलो करत असाल किंवा शेअर करत असला तर यासाठी आपण स्वत: जबाबदार राहाल.”