मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 17 मे 2023 (14:10 IST)

दिल्ली मेट्रो: दरवाजा उघडताच मुलाने मुलाला प्रपोज केले

Boy Proposed To Boy In Delhi Metro: दिल्ली मेट्रो खूप चर्चेचा केंद्र बनली आहे, अशा परिस्थितीत दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

या व्हिडीओ मध्ये दिसत आहे मेट्रोचे दार उघडणार इतक्यात एक मुलगा गुडघ्यांवर हातात गुलाबाचे फूल घेऊन बसलेला आहे. दरवाजा उघडताच दुसरा मुलगा आत शिरला. त्यानंतर जे घडते ते पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना धक्काच बसतो. खरं तर, दुसरा मुलगा मेट्रोत शिरताच तो मुलगा त्याला गुलाबाचं फूल देतो आणि मग त्याला मिठी मारतो.दोघांची घट्ट मैत्री इथे दिसते. 
 
जवळ असलेल्या एका मुलीला हे सगळे पाहून जणू धक्काच बसला .तिची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. 
ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रियाही देत ​​आहेत.  हा व्हिडिओ '@ProfesorSahab' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे,एका यूजरने लिहिले की, दिल्ली मेट्रोमध्ये काय चालले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. 
 
Edited by - Priya Dixit