मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (12:58 IST)

धोनीने साक्षीला व्हिंटेज कार भेट दिली

माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी यांचा 4 जुलै रोजी 11 व्या लग्नाच्या वाढदिवशी महेंद्र धोनी यांनी आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने व्हिंटेज कार भेट दिली आहे.धोनी आणि साक्षी हे 4 जुलै 2010 रोजी वैवाहिक बंधनात बांधले गेले होते.
 
त्यांच्या पत्नी ने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेयर केले असून धोनीला वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या गिफ्टसाठी धन्यवाद असे म्हटले आहे.साक्षीने आपल्या स्टेट्स मध्ये इतर काही आनंदाच्या क्षणाचे फोटो देखील ठेवले आहेत.
 
साक्षीने आपल्या सोशल मिडीयावर लग्नाच्या वाढदिवसाचे बरेच फोटो शेयर केले आहे.या मध्ये  फोक्सवॅगन बीटल व्हिंटेज कारचा फोटो देखील आहे.त्यांचे चाहते त्यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव करीत आहे.