1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. Dr. Udit Narayan, Kumar Sanu, Ranveer Shorey. Babasaheb Ambedkar National Award

उदित नारायण, कुमार सानू, रणवीर शोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई,: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते  विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार 2023’राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धम्मदान ट्रस्ट व ‘परफेक्ट वुमन’मासिकातर्फे करण्यात आले होते.
 
राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण व कुमार सानू, अभिनेते रणवीर शोरे, पर्यावरण परिषदेचे विजयराजे धमाल, दीपशिखा देशमुख, रिना त्रिवेदी, डॉ खुशी गुरुभाई, कैलास मासूम, सीताराम गायकवाड, मोहम्मद सईद शेख व राखी राजाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे निमंत्रक गुरुभाई सुरेशभाई ठक्कर, वास्तू तज्ज्ञ बसंत रसिवासिया, डॉ.गीत ठक्कर व चंद्रमणी जाधव यावेळी उपस्थित होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
फक्त मराठी माणूस केंद्रीय तपास यंत्रणांच्या आणि त्यातही ईडीच्या रडारवर