संबंधित माहिती
- मुंबईतील धीरूभाई अंबानींच्या शाळेला बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी
- धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली, फोन करून म्हटले - लावला आहे टाईम बॉम्ब
- राखी सावंतच्या आईची प्रकृती खालावली, कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमर झाला
- RIP विश्वास मेहेंदळे
- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील ३ ठार
पंतप्रधान १९ जानेवारीला मुंबईत येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्धाटन आणि भूमिपूजन करणार आहे. त्यात मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ सह मुंबई मेट्रोच्या २ नव्या मार्गिकेचे उद्धाटन करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक परिषदेत भाग घेण्यासाठी १५ जानेवारीला दावोसला जाणार होते. मुख्यमंत्री शिंदे नियोजनानुसार दावोसला जातील परंतु १८ जानेवारीला ते परत मुंबई येतील. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींचा दौरा असल्यानं दावोस दौरा रद्द केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण असल्याने त्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor