रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (08:35 IST)

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील ३ ठार

accident
पालघर जिल्ह्यातील कासाजवळ एका गाडीचा भीषण अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  झालेल्या या अपघातामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे साठी जण एकाच कुटुंबातील होते. मिळालेल्या माहितीनुसार, खड्डा चुकवण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार. नालासोपारा येथे वास्तव्यास असणारे राठोड कुटुंब हे गुजरातमधील भिलाड येथे जात होते. अंदाजे दुपारी १च्या सुमारास श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुमारे १ किलोमीटर अंतरावरील खड्डा चुकवताना हा अपघात घडला. गाडी चालवत असलेले दीपक राठोड यांचा अंदाज चुकल्याने कंटेनरला मागच्या बाजूने गाडीने धडक दिली. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. ६५ वर्षीय नरोत्तम राठोड, ३२ वर्षीय केतन राठोड आणि अवघ्या १ वर्षाच्या आर्वी राठोडचा मृतांमध्ये समावेश आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor